देशातील आणखी एक एलजीबीटी कम्युनिटी समाजाच्या बरोबरीच्या दर्जासाठी लढत आहेत.भारतात एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करणारी देशातील ही पहिली ट्रान्सजेंडर ठरली आहे. हिच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, लोकांचे टोमणे ऐकून आपली जीवन संपविण्याचा विचार करत होती तिरुवनंतपुरममध्ये राहणारी ट्रान्सजेंडर झारा शेखने नुकतेच टेक्नोपार्कमध्ये यूएसटी ग्लोबल कंपनीतील ह्यूमन रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये एक सीनियर असोसिएट जॉईन केले केरळ यूनिवर्सिटीतून ग्रॅज्यूएट झाराचे म्हणणे आहे की, एक मल्टीनॅशनल कंपनीत काम करणे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. याआधी तिने अबु धाबी आणि चेन्नईतील काही कंपन्यात काम केले आहे.- तिने सांगितले की, ''मला मुलींना पसंत गोष्टी आवडतात. मला लिपस्टिक आणि आय लायनर वापरायला आवडायचे. मात्र, तेथील कंपन्यात यावर बंदी आहे. मी आत्महत्येचा विचार करत होते कारण मला हवे तसे आयुष्य जगण्याची परवानगी नव्हती."झारा लवकरच सेक्स चेंजची सर्जरी करणार आहे. ती अनेकदा यासाठी मुंबईत येत असते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews